(Shabari Awas Yojana)
शबरी आवास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील बीपीएल कुटुंबांना कायमस्वरूपी घरकुल उपलब्ध करून देण्यात येते. शासनाच्या निधी सहाय्याने सुरक्षित निवास, जीवनमान सुधारणा व आदिवासी समाजाचा विकास साधणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.